Friday, July 28, 2017

हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते


हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग
हो....हसतो उगाच स्मायलिंग
बघता तुला मन जम्पिंग
वाटे हवे हे गोड फिलिंग
धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे
वाटेवरी मी रोजच्या असतो उभा
दिसशील का कधी तरी
दिसलीस की  झंकारते
उठते मनी किण किण ही गोड गोड शी
रोखुनि मला तू बघशी
गोड तू जराशी हसशी
येशी अन तशीच जाशी
शब्द ना सुचे मग काही
बोलणे ही जमतच नाही
गोंधळून वेडे मन जाई
हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग

चित्रपट - ती सध्या काय करते
स्वर - विधीत पाटणकर
संगीत - विश्वजीत  जोशी
गीत -  विश्वजीत  आणि  श्रीरंग गोडबोले