Thursday, July 27, 2017

ती मी - फुंतरु

ती स्वप्नातल्या परीसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातुनी सजावी तशी
मी असा वेडासा कधी थोडासा
स्वतःशी हसतो नशा प्रेमाची
तिच्या स्पर्शाची मनाशी जपतो
कधी कुठे मिळाव्या वळणावरती वाटा ह्या.. दोन्ही
ती चढते नशा बेधुंदशा श्वासापरी
ती कैफातल्या बेफिक्रशा भासापरी
सहजच यावे ओठांवरती
गीत जसे भेटते कोणी
गुणगुणताना भिरभिरते
बनून पाखरू मनासभोवती
हसताना ती भुलतोच मी
लपताना तू झुरतो मी
मन माझे वेडे हे सावरू..कसे
ती स्वप्नातल्या परीसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातुनी सजावी जशी
चित्रपट - फुंतरु
स्वर - जसराज जोशी
गीत -
संगीत -