Thursday, July 27, 2017

अग ऐक ना - मुरांबाअग ऐक ना!!
अग ऐक ना
जरा बसतेस का
रुसवा फुगवा सोड ना
जरा हसतेस का
जा चालता हो किती बोर आहेस
सिरियसनेस नाही तुला किती छजोर आहेस
करू नको ना त्रागा माय फेव्हरेट इंदू
लव्ह स्टोरी चा सागा मला नको ना निंदू
अरे जा घरी जा ना... जा ना
अग ऐक ना जरासच बसतेस का
अग ऐक ना जरासच हसतेस का
ए चल जा चल
ओके मी कल्टी
टपोऱ्या  डोळ्यांचा हा चिडका बिब्बा
झोन हा तुझा तू सोड ना
कान्ट लिव्ह विदाऊट यु तू श्वास माझा
सारे जुने क्लिशे फोड ना
मेड फॉर इच अदर चा एक दस्तुर आहे
राग खरतर वर दिसतो आत हुरहुर आहे ग
एफबी मेसेज सारखा पॉपअप  हो ना
जस्टिन बिबर सारखा पम्पअप हो ना
अग जा घरी जा ना
अरे ऐक ना जरा बसतोस का
नाही बसणार
अरे ऐक ना
नाही ऐकणार
जरा बसतोस का
रुसवा फुगवा सोड ना जरा हसतोस का
चित्रपट - मुरांबा
स्वर - आनंदी जोशी, रोहित राऊत
शब्द - जितेंद्र जोशी
संगीत - शैलेंद्र बर्वे