Thursday, December 22, 2011

सजवून साज जशीसजवून साज जशी
रुणझुण सांज तशी
सजणी तू रंग बावरी ||२||
सरल वारं सुखाची
रीमिझीमे जशी
छेडीयल गुज जणू
श्वासातुनी आज कुणी
हरपून भान अशी
मिठी तुझीच तशी
सजणा मी सांज सावळी 

नजर तुझी हि प्रिया वेड लावी
भिरभिरते मी अशी भोवताली
गो-या गो-या गालावरी आज लाज आली
अवखळ डोळ्यात या प्रीत गीत झाली
कशी भूल जीवाला या पडते
मखमल मनि उलगडते
काळजाच्या काठावर हलते
छेडी कोणी तार जशी..
ला ला ला..
सजणा मी सांजसावळी   

हरपून भान अशी
मिठी तुझीच तशी
सजणा मी सांजसावळी   
सरल वारं सुखाची
रीमिझीमे जशी
छेडीयले  गुज जणू
श्वासातुनी आज कुणी
सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी
सजणी तू रंग बावरी

दव हळवे मी धुके धुंद व्हावे
बिलगून राणी तुला पांघरावे
विसरून थांग सावली तुझीच व्हावे
अलगद वाटेने तुझ्यात मी भिनावे
तुझ्यासाठी अशी तळमळते
तुझ्या भोवताली घुटमळते
पुनवेच्या चांदासाठी झुरते
वेडीपिशी रात जशी

सजवून साज जशी
रुणझुण सांज तशी
सजणी तू रंग बावरी
सरल वारं सुखाची
रीमिझीमे जशी
छेडीयले  गुज जणू
श्वासातून आज कुणी

हरपून भान अशी
मिठी तुझीच तशी
सजणा मी सांज सावळी 
चित्रपट : आता ग बया
संगीत : अजय अतुल
स्वर :  हरिहरन, महालक्ष्मी  अय्यर

No comments:

Post a Comment