Thursday, December 22, 2011

मोरया शीर्षक गीततूच माझी आई देवा... तूच माझा बाप
गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप ||२|| 
चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया ||२|| 

गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||२||

काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय ||२||
माझा श्वास हि तुझीच माया तुझे हात पाय ||२||
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य
का खेळिसी खेळ असा हा सारे अग्यम
तारू माझे  पैलतीरी पार कराया


गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||२||
हो ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच
कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ||२||
देवा तुला देवपण देती भक्तगण
दानवांना पापकर्म शिकवीतो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया


गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया 
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||२||

सुखकर्ता दुख:हर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पूरती ||२||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकूमकेशरा 
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पूरती ||२||
लंबोदर पितांबर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना 
दास रामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना 

जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन:कामना पूरती ||२||


घालीन लोटांगण वंदिन चरण
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगिन  अनंत पूजिन
भावे ओवाळिन म्हणे नामा
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्व मम देवदेव
कायेन वाचा मनसेंद्रीयैर्वा
बुद्ध्यात्मना व प्रकृतिस्वभावात
करोनी यद्यत सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि
अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरि
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं 
जानकीनायकं रामचंद्रम भजे   
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

चित्रपट : मोरया
संगीत : अवधूत गुप्ते
स्वर : अवधूत गुप्ते , स्वप्नील बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम 


No comments:

Post a Comment