Saturday, February 5, 2011

नवरी आली - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवेगो-या गो-या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडव दारी
किन किन कांकन रुणुझुणु पैंजण सजली नटली नवरी आली

नवा-या मुलाची आली हळद हि ओली, हळद हि आली लावा नवरीच्या गाली
हळदीने नवरीचं अंग माखावा,  पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडव दारी
सासरच्या ओढीन हि हसते हळूच गाली ग  पोरी नवरी आली
सनईच्या सुरामंदी  चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
आला नवरदेव वेशीला वेशीला ग देवा नारायण आला ग
मंडपात गणगोत सार बैसल  ग पोर थोर ताश्या वाजी र

सासरी मिळू दे तुला माहेराची माया, माहेराच्या मायेसंग सुखाची ग छाया
भरुनीया आल डोळ जड जीव झाला,  जड जीव झाला लेक जी सासरा
किन किन कांकन रुणुझुणु पैंजण, सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सारी तुझ्या बरसू दे घरी दरी, ग पोरी सुखाच्या सरी
सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला वेशीला ग देवा नारायण आला ग 
मंडपात गणगोत सार बैसल  ग पोर थोर तश्या वाजी र 

चित्रपट  : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे 
संगीत   : अजय अतुल 
स्वर      : योगिता गोडबोले, प्राजक्ता रानडे  
गीत      :  गुरु ठाकूर